जळगाव प्रतिनिधी । हार्डवेअरच्या दुकानाला अचानक लागलेल्या आगीत सुमारे ५ ते ६ लाख रूपयांचे नुकसान झाल्याची घटना आज सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. आग लागण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. एमआयडीसी पोलीसात आगीची नोंद करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की, शहरातील शाहीद शेख मुस्ताक शेख (वय-२८) रा. मास्टर कॉलनी यांचे त्यांचे नशिराबाद येथील आठवडे बाजारात स्टार हार्डवेअरचे दुकान आहे. सुप्रिम कॉलनीतील ममता बेकरीजवळ मित्रांच्या जागेवर दुकानाचे गोडावून आहे. या ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये चिनीमातीचे टॉयटेलसह, पाण्याच्या टाक्या आदी सामान ठेवले जाते. आज सकाळी १० वाजेच्या सुमारास अनाचकपणे पत्र्याच्या शेडमधून धुर निघायला लागल्याचे शेजारचांच्या लक्षात आले. त्यांनी ताबडतोब शाहीद शेख यांना संपर्क साधून आग लागल्याची माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेवून खासगी टँकरच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महापालिकेचे दोन बंब बोलावून ही आगविझविण्यात आली. आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, या आगीत गोडावून मध्ये ठेवलेले संडासचे चिनीमातीचे भांडे, ५० ते ६० जुने फ्रीज, पाण्याच्या टाक्या, पाईप फिटींगचा सामान, प्लश स्टॅण्ड, पाईपाचे बंडल, सीट कव्हर हे जळून खाक झाले आहे. दरम्यान, या आगीत सुमारे ५ ते ६ लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीसांनी धाव घेतली असून पंचनामा केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस कर्मचारी करीत आहे.
https://www.facebook.com/508992935887325/videos/752034718751614