Home क्राईम सुप्रिम कॉलनीतील विवाहितेचा छळ

सुप्रिम कॉलनीतील विवाहितेचा छळ


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी माहेर असलेल्या विवाहिते शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत सोमवारी १३ मार्च रोजी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनीत माहेर असलेल्या रुकसार जितेंद्र उर्फ मुन्ना पाटील (वय-२५) यांचा विवाह शहरातील शिवकॉलनी येथील जितेंद्र भगवान पाटील यांच्याशी रीतीरिवाजानुसार झालेला आहे. दरम्यान पती जितेंद्र भगवान पाटील याने पत्नीला नांदवायचे नाही असे सांगून वारंवार मानसिक व शारीरिक त्रास देऊन छळ केला. तसेच माझा पिछा सोड असे बोलून तिला त्रास दिला. शिवाय सासू, सासरे आणि काका यांनी देखील मानसिक त्रास दिला. हा छळ सहन न झाल्याने विवाहिता माहेरी सुप्रीम कॉलनी येथे निघून आल्या. दरम्यान, सोमवारी १३ मार्च रोजी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन विवाहितेने तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती जितेंद्र भगवान पाटील, सासू उषा भगवान पाटील, सासरे भगवान पाटील आणि काका संजीव पाटील सर्व रा. शिव कॉलनी जळगाव यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल महेंद्रसिंग पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound