
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ईशान्य दिल्लीत जाफराबाद येथे सुधारित नागरिकत्व कायद्या(सीएए) व एनआरसीच्या मुद्यावरून समर्थक आणि विरोधक यांच्यात उफाळलेल्या हिंसाचारात एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे एक आंदोलक खुलेआम रस्त्यावर गोळीबार करत होता.
दिल्लीत सीएए समर्थक आणि विरोधी आंदोलनाने हिंसकरुप धारण केले आहे. दिल्लीच्या जाफराबादमध्ये मोठ्या संख्येने आंदोलक जमा झाले होते. आंदोलकांनी नेमौजपूर भागात दोन घरेही पेटवली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रू धुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. जाफराबादमध्ये तणावाची परिस्थिती आहे. शिवाय, समाजकंटकांडून काही दुकानं जाळण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
या हिंसक आंदोलात दिल्लीत पोलिसातील एक हेडकॉन्स्टेबल ठार झालाय. तर पोलीस उपायुक्तांसह अनेक पोलीस जखमी झाले आहेत. दिल्लीतील गोकुलपुरी भागात आंदोलनादरम्यान गोळीबार करण्यात आला. यात कॉन्स्टेबल रतन लाल यांचा मृत्यू झाला. तर डीसीपी अमित शर्मा हे जखमी झालेत.