नवी दिल्ली वृत्तसंस्था । विना अनुदानीत गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याच्या निषेधार्थ महिला काँग्रेसतर्फे उद्या राष्ट्रव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे.
आज ऑईल कंपन्यांनी विना अनुदानीत गॅस सिलेंडरच्या मूल्यात तब्बल १४५ रूपयांची वाढ करण्यात आली आहे. आधीच महागाईने जेरीस आलेल्या नागरिकांवर हा नवीन बोजा पडणार असल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या महागाईचा निषेध म्हणून महिला काँग्रेसतर्फे गुरूवारी देशव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. देशभरात हे आंदोलन करण्यात येणार आहे.