सिध्दार्थ शुक्ला ठरला बिग बॉस-१३ चा विजेता !

siddharth shukla

मुंबई प्रतिनिधी । अभिनेता सिध्दार्थ शुक्ला याने बिग बॉस स्पर्धेच्या तेराव्या सिझनमध्ये विजेतेपद पटकावले असून त्याला ट्रॉफीसह तब्बल ४० लाखांचे रोख पारितोषीक मिळाले आहे.

बिग बॉसमध्ये अंतिम फेरीपर्यंत प्रचंड चुरस होती. अंतिम सोहळा सुरू झाल्यानंतर सर्वात आधी पारस छाब्राने बिग बॉसच्या घरातून पाय काढला. त्यानं सलमान खानची दहा लाखांची ऑफर घेत बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतली. त्यानंतर शहनाझ गिल, सिद्धार्थ शुक्ला, असिम रियाज, रश्मी देसाई आणि आरती सिंह यांच्यात अंतिम लढत झाली. शहनाझ गिल, रश्मी देसाई आणि आरती सिंह यांनीही बिग बॉसच्या घरातून पाय काढला. अखेर सिद्धार्थ शुक्ला आणि असिम रियाज यांच्यामध्ये बिग बॉसच्या जेतेपदाची लढत झाली. अंतिम निकालासाठी १५ मिनिटांसाठी लाइव्ह व्होटिंग लाइन ओपन करण्यात आली. यामध्ये प्रेक्षकांनी सिद्धार्थला कौल दिल्याने त्याने या सीझनचे जेतेपद पटकावले.

या अंतिम सामन्यात होस्ट सलमानने धमाल मस्ती केली. त्याने सुनील ग्रोव्हर, हरभजन आणि कैफ यांच्यासह उपस्थितांचे मनोरंजन केले.

Protected Content