फिल्मफेअर पुरस्कारांवर गली बॉयचे वर्चस्व

gully boy

गुवाहाटी । येथे रंगलेल्या अमेझॉन फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात गली बॉय या चित्रपटाने तब्बल दहा अ‍ॅवॉर्डस मिळवून आपले वर्चस्व दाखवून दिले. विशेष बाब म्हणजे हा सोहळा पहिल्यांदाच आसाममध्ये आयोजित करण्यात आला.

६५ वा मेझॉन फिल्मफेअर पुरस्कार यंदा आसाममध्ये गुवाहाटी येथील इंदिरा गांधी अ‍ॅथलेटिक स्टेडियममध्ये दणक्यात पार पडला. यात मनोरंजन सृष्टीतील अतुलनीय योगदानासाठी रमेश सिप्पी यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे अभिनेता गोविंदा यांना एक्सलन्स इन सिनेमा हा विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या सोहळ्यात गली बॉयची छाप दिसून आली. सर्वोत्तम चित्रपटाससह दिग्दर्शक, अभिनेता आणि अभिनेत्री हे तिन्ही मानाचे पुरस्कार अनुक्रमे झोया अख्तर, रणवीरसिंग आणि आलीया भट्ट यांनी पटकावले. शाहरुख खान आणि सलमान खान यांनी नव्वदच्या दशकातील सिनेगीतांवर अफलातून नृत्य सादरीकरण केले. करण जोहर आणि अभिनेता विकी कौशल यांच्या सूत्रसंचालनाने हा सोहळा रंगतदार झाला.

Protected Content