सिंधी कॉलनी परिसरातून दुकानदाराची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सिंधी कॉलनी सेवा मंडळ समोरून एका दुकानदाराची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. यासंदर्भात शुक्रवारी २१ एप्रिल रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, महेश भागचंद राजपाल (वय-४४) रा. समाधान नगर, सिंधी कॉलनी, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे.  सिंधी कॉलनीतील सेवा मंडळासमोर जनरल दुकानासमोर १८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता महेश राजपाल यांनी त्यांची मालकीची दुचाकी (एमएच १९ बीबी १०२८) ही पार्किंग करून लावली होती. दरम्यान अज्ञात चोरट्याने ही दुचाकी चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महेश राजपाल यांनी परिसरात शोध घेतला, परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. त्यामुळे त्यांनी शुक्रवारी  २१ एप्रिल रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक किशोर पाटील करीत आहे.

Protected Content