सिंधी कॉलनीसह एक किलोमीटरचा परिसर होणार सील ( व्हिडीओ )

भुसावळ प्रतिनिधी । शहरात दुसरा कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्यानंतर प्रशासनाने तातडीने सिंधी कॉलनीसह एक किलामीटरचा परिसर सील करण्याची तयारी सुरू केली असून याला रात्रीपासूनच प्रारंभ करण्यात आला आहे.

सिंधी कॉलनी भागातील पानमसाला विक्री करणारा एका पुरुषाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी रामसिंग सुलाने, तहसीलदार दिपक धिवरे,उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, मुख्याधिकारी करुणा डहाळे, बाजारपेठचे निरिक्षक दिलीप भागवत यांच्यासह तहसील व नगरपरिषद प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी धाव घेतली. प्रशासनाने सिंधी कॉलनीसह एक किलोमीटरचा परिसर सील करण्याचा निर्णय घेतला आहे. यात वांजोळा रोड, गजानन महाराज मंदिर,राजस्थान मार्बल, सुहास हॉटेल, आनंद नगर, गंगाराम प्लॉट,नाहाटा कॉलेज ते अष्टभुजा मंदिर पर्यंतचा परिसराला १४ दिवसापर्यत सील करण्यात येणार आहे. सील करण्यात येणार्‍या परिसरातील नागरिकांना घराबाहेर येण्यास बंदी आहे.तसेच जीवनावश्यक वस्तू मधील मेडिकल सुरू राहणार असून सर्व दुकाने बंद राहणार आहेत.

खाली पहा : या संदर्भातील दोन व्हिडीओ.

https://www.facebook.com/watch/?v=234691280974593

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/248555019850011

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content