जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गोपाळपुरा येथील माहेर असलेल्या विवाहितेला सासरच्या मंडळींकडून शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत सोमवारी २३ जानेवारी रोजी शनिपेठ पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील जुना असोदा रोडवरील गोपाळपुरा येथील माहेर असलेल्या वैशाली रविंद्र सुतार (वय-२६) यांचा विवाह परभणी येथील रवींद्र देविदास सुतार यांच्याशी सन-२०१९ मध्ये रीतीरीवाजानुसार झाला. लग्नाचे सुरुवातीचे दिवस चांगले गेल्यानंतर विवाहितेला काहीही कारण नसताना टोचून बोलणे सुरू केले. तसेच लग्नात मानपान दिला नाही म्हणून छळ करण्यास सुरुवात केली. तसेच सासरे, सासू चुलत जेठ, जेठणी याने देखील छळ केला. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता जळगाव येथील गोपाळपुरा येथे माहेरी निघून आल्या. सोमवारी २३ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती रवींद्र देविदास सुतार, सासरे देविदास गंभीरदास सुतार, सासू सुनंदा देविदास सुतार, चुलत जेठ गणेश गोपाळ सुतार, जेठाणी सुरेखा गणेश सुतार, भानुदास गंभीरदास सुतार, रजनी भानुदास सुतार सर्व रा. परभणी यांच्या विरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक किरण वानखेडे करीत आहे.