सावधान… मध्यरात्री महामार्गावर गाडी थांबवताय, तर असा प्रसंग आपल्यावरही येवू शकतो !

पारोळा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मध्यरात्री राष्ट्रीय महामार्गावर हात देवून कुणी मदतीची अपेक्षा करत असेल तर आपण तात्काळ कोणताही विचार न करता मदतीसाठी थांबतो. पण सावधान ही मदत आपल्या कधीतरी महागात पडू शकते. अशीच घटना पारोळा गावाजवळ एका चालकासोबत घडलाय.

 

तर माहिती अशी की, दिपक भिला पाटील (वय-३६) रा. करंजी ता. पारोळा हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खासगी वाहन चालवून आला कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गुरूवार ५ मे रोजी मध्यरात्री २.३० वाजेच्या सुमारास ते त्यांचे वाहन आयशर (एमएच १८ बीजी ३२) ने अर्जंट माल पोहचविण्यासाठी खामगावकडे रवाना झाले. दरम्यान, पारोळा गावाच्या पुढे नवीन बायपास रोडच्या कार्नरजवळ रात्री ३ वाजेच्या सुमारास एक महिला व एक व्यक्ती गाडीला हात दिला. त्यांना कुठेतरी जायचे असेल असा विचार करून दिपक पाटील यांनी वाहन थांबविले. क्लिनर साईडचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला परंतू उघडत नव्हता. म्हणून दिपक पाटील हे खाली उतरले असता अजून दोन व्यक्ती त्यांच्याजवळ येवून कॉलर पकडून बेदम मारहाण करण्यास सुरूवात करून त्यांच्या जवळील मोबाईल आणि रोकड असा एकुण १२ हजार ५०० रूपये किंमतीच मुद्देमाल चोरून नेला. दरम्यान त्यांना गाडीतील माल अर्जंट पोहचविण्यचे असल्याने त्यांनी पोलीसात कोणतीही तक्रार दिली नव्हती.

 

दरम्यान, दिपक पाटील हे माल पोहचवून घरी आले तेव्हा त्यांनी वर्तमान पत्रात ट्रकचालकाला लुटणाऱ्या लोकांना पोलीसांनी पकडले आहे. असे समजल्यावर दिपक पाटील यांनी तात्काळ पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेवून माहिती दिली. अटक केलेल्या संशयित आरोपींना त्यांनी तात्काळ ओळखले. त्यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अमोल दत्तू पाटील, लखन फकीरा गायकवाड, भुऱ्या उर्फ नाजिम खान मुक्तारखान कुरेश, ज्योतीबाई (पुर्ण नाव माहित नाही सर्व रा. राजीव गांधी नगर, पारोळा ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र बागुल करीत आहे.

 

Protected Content