साऊंड व्यावसायिकांना परवानगी द्या : साऊंड असोशिएशनची मागणी (व्हिडिओ )

जळगाव, प्रतिनिधी । येथील जळगाव साऊंड असोशिएशनद्वारा साऊंड व्यावसायिकांचा लॉक डाऊनच्या कालावधीत बंद असलेल्या व्यवसाय पुन्हा सुरु करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार राजूमामा भोळे यांची भेट घेऊन त्यांनादेखील निवेदन दिले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च ते ऑगस्टपर्यंत सर्व व्यवहार ठप्प झालेत. या कालावधीत कोणतेही काम मिळाले नसल्याने साऊंड व्यावसायिकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. सरकारने साऊंड व्यावसायिकांना परवानगी द्यावी अन्यथा त्यांना अनुदान द्यावे अशी मागणी आ. राजूमामा भोळे यांनी केली आहे. त्यांचे सर्व प्रकारचे बँक हप्ते एल आय सी हप्ते, साऊंड सिस्टिमसाठी काढलेले कर्ज, गाडीचे हप्ते, गोडाऊनचे भाडे, कर्मचाऱ्यांचे पगार आदी थकीत झाले आहे. मागील ४ ते ५ महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्याने घरखर्च देखील करणे अवघड झाले आहे. इतर व्यावसायिकांना व्यवसायासाठी ज्या प्रमाणे अटी शर्तींना अधीन राहून परवानगी देण्यात आली आहे त्याच प्रमाणे साऊंड व्यावसायिकांना देखील परवानगी देण्यात यावी अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली आहे. निवेदनांवर संघटनेचे अध्यक्ष महेंद्र परदेशी, उपाध्यक्ष योगेश गवळी, सचिव संदीप धांडे आदींनी केली आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/303473697629521/

Protected Content