सावद्यात एकाच कुटुंबातील तिघी कोरोना पॉझिटिव्ह

सावदा ता.रावेर, प्रतिनिधी । येथील एका महिला होमगार्डसह दोघं महिलांना कोरोनाची लागण झाल्याच निष्पन्न झाले आहे. आजपर्यंत ९० जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

सावदा येथील कोष्टी वाड्यातील एकाच कुटुंबातील तिघीचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यात तिघींचा अहवाल पॉझिटव्ह आला असून ६०, २५ व २२ वर्षीय महिलांचा समावेश आहे. सावदा येथे एकुण ९० रूग्ण बाधित झाले असून दहा जणांचा मृत्यू झाला तर ७ जण उपचार घेत आहेत. या वृत्तास मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी दुजोरा दिला आहे.

Protected Content