सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । २४ मे रोजी उपचार सुरू असतांना मृत झालेल्या रूग्णाच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट आज पॉझिटीव्ह आला आहे.
सविस्तर वृत्त सोबतच्या लिंकवर क्लिक करून वाचा
सावदा येथे कोरोनाचा संसर्ग वाढील लागल्याचे आता दिसून येत आहे. २४ मे रोजी कोरोनाचा संशयित रूग्ण म्हणून उपचार सुरू असतांना ४८ वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. मृत्यूआधी संंबंधीत रूग्णाचा स्वॅब काढून तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. आज संबंधीत रूग्ण हा कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे दिसून आले आहे. हा रूग्ण संभाजी चौक परिसरातील रहिवासी आहे. तो पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आता त्याच्या कुटुंबियांसह संपर्कात आलेल्यांना क्वॉरंटाईन करण्यात येणार आहे.
दरम्यान, सावद्यात आजवर कोरोनाचा नऊ रूग्ण आढळून आले असून यातील पाच मयत असून चौघांवर उपचार सुरू आहे. मुख्याधिकारी सौरभ जोशी आणि सपोनि राहूल वाघ यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने संबंधीत रूग्णाचा रहिवास असणारा परिसर सील करण्यास प्रारंभ केला आहे. दरम्यान, प्रशासनाला माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे हे आपल्या सहकार्यांसह मदत करत असल्याचे दिसून येत आहे.