धरणगाव येथे ‘लक्ष्मी नगर’ फलकाचे उद्घाटन

धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव ग्रामीणमधील लक्ष्मी नगर फलकाचे उद्घाटन तहसीलदार नितीन देवरे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, पी.एम.पाटील आदी उपस्थित होते.

याप्रसंगी धरणगाव नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी धरणगाव शहर कोरोनामुक्त करण्यासाठी अथक परिश्रम घेत असल्याने लक्ष्मी नगरचे अध्यक्ष पी.एम.पाटील यांनी सत्कार केला. धरणगाव शहरातील सर्वात मोठा ले-आउट असलेल्या तेरा एकरच्या परिसरात १७५ प्लॉट असून 40 टक्के हे रहिवास करीत आहेत. 60 टक्के बांधकामाच्या मार्गावर आहेत. रस्ते, लाईट, गटर या समस्या सोडविण्यासाठी पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांना निवेदन देण्यात येणार आहे.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी सत्तार पटेल, यासीन पटेल, महेंद्र पवार, वसंत बाविस्कर, योगेश पाटील, अतुल पटेल, चंद्रभान पावर, शांतिलाल पाटील, योगेश राजपुत, प्रकाश सोनवणे, किसन राठोड, प्रविण भोई, गोविंदा पाटील, विजय अहिरे, अर्जुन वाघ, संजय महाजन, अनिस पटेल, अजय शिंदे लक्ष्मी नगर निवासी उपस्थित होते.

Protected Content