सावदा शहराच्या वाढिवहद्दीत जंतुनाशकाची फवारणी करण्याची मागणी

सावदा, प्रतिनिधी । देशभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉक डाऊन करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथील नगरपालिकेने विविध उपाययोजना हाती घेतले आहेत. यात शहरातील व शहराहद्दबाहेरील भागात जंतूनाशक व सँनिटायझर्सद्वारे फवारणी करावी करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक फिरोजखान हबीबुल्लाखान पठाण, युवासेना जिल्हा सरचिटणीस सुरज परदेशी, आदींनी मुख्याधिकारी सौरभ जोशी यांचे कडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

शहरात नगरपालिकेतर्फे धूरफवारणी व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची फवारणी करण्यात आली नसून शहरात व वाढिवहद्द बाहेर सोडियम हायपोक्लोराइटची हातपंपाद्वारे फवारणी तसेच सँनिटायझर्सची फवारणी करून जंतूनाशकाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अंमलबजावणी करण्यात यावी. जेणेकरून शहरात व वाढिवहदद बाहेरून कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी परिणामी आळा घालण्यासाठी मदतच होईल.निवेदनात म्हटले आहे की, शहरातील गर्दी होणार्‍या भागातील उघड्यावर असलेल्या गटारी, गावाच्या बाहेरील गटार, नाले यावर जंतूनाशकाची फवारणी करण्यात यावी. तसेच नागरिकांनी लॉक डाऊन पाळून नगरपालिका कामांमध्ये सहकार्य करावे असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर नगरसेवक फिरोजखान पठाण व युवासेना जिल्हा सरचिटणीस सुरज परदेशी यांचे कार्यकर्तेच्या सह्या आहेत.

Protected Content