सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । येथील हॉटेल हिना पॅलेसमध्ये चोरट्यांनी डल्ला मारून सुमारे ४.६७ लाख रूपयांच्या मद्य व बियरच्या बाटल्या लंपास केल्याची घटना आज उघडकीस आली.

याबाबत वृत्त असे की, शहरातून जाणार्या रावेर रोडवर हॉटेल हिना पॅलेस हे परमीट रूम व बियरबार आहे. सध्या लॉकडाऊनमुळे हे हॉटेल बंद आहे. दरम्यान, आज हॉटेलच्या मागील बाजूस असणारे गेट तोडून चोरट्यांनी डल्ला मारल्याचे दिसून आले. यात चोरट्यांनी सुमारे ४ लाख ६७ हजार ४०० रूपये मूल्य असणार्या मद्य व बियरच्या बाटल्या चोरून नेल्याचे निदर्शनास आले. तसेच चोरट्यांनी डीव्हीआर सेटदेखील चोरून नेला.
या संदर्भात हॉटेल हिना पॅलेसचे व्यवस्थापक कृष्णा सुधाकर कोष्टी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सावदा पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००