सावदा जितेंद्र कुळकर्णी । भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील बेपत्ता झालेल्या ६९ वर्षीय वृध्दाचा मृतदेह बोरघाट परिसरात सोमवारी आढळून आला होता. या गुन्ह्यातील दोन संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. आज न्यायालयात हजर केले आत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील रहिवाशी चांगो रामदास झोपे (वय-६९) हे २९ जानेवारी पासून शहरातून बेपत्ता होते. याबाबत वरणगाव पोलीस ठाण्यात मुलगा राकेश झोपे यांच्या खबरीवरून बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान सोमवारी सकाळी सावदा निंभोरा गावाजवळील बोरघाट परिसरात निर्जळस्थळी मयतस्थितीत मृतदेह आढळून आला होता. यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. घटनास्थळी पोलीस अधिक्षक डॉ प्रविण मुंढे यांनी धाव घेवून घटनेची माहिती घेतली. सावदा पोलीसात अज्ञात व्यक्तीविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी दाखल झाले.
पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, विभागीय पोलीस अधिकारी विवेक लावंड यांनी गुन्ह्यातील तपासाचे चक्रे फिरविली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, सावदा पोलीस ठाण्याचे सपोनि डी.डी. इंगोले व वरणगाव पोलीस ठाण्याचे सपोनि संदीपकुमार साळुंखे यांना गोपनिय माहिती मिळाल्यावरून मयताचा मुलगा राकेश झोपे यांचा मित्र संशयित आरोपी शेख सलीम शेख कादीर (वय-३२) आणि शेख जावेद शेख खलील (वय-३२) दोन्ही रा. खिडकी मोहल्ला, वरणगाव यांना अटक केली. दोघांची कसून चौकशी केली असता खून केल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आज दोघांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
https://www.facebook.com/508992935887325/videos/241121507474557