कोटेचा महिला महाविद्यालयात कर्नल उत्तम पाटील यांचे व्याख्यान

भुसावळ – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील श्रीमती प. क. कोटेचा महिला महाविद्यालयात ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा’ निमित्त धुळे येथील कर्नल उत्तम पाटील यांचे व्याख्यान आज संपन्न झाले.

आज सोमवार दि. ०८ ऑगस्ट रोजी कर्नल पाटील यांनी आपल्या व्याख्यानातून ऑपरेशन ब्लू स्टार मिझोरामचे शांततापूर्ण मिझोराम, NoArmy in Mizoram, कारगिल मिशन अशा विविध आर्मी ऑपरेशनचा इतिहास विद्यार्थिनींना सांगितला.

आजच्या विद्यार्थिनींसाठी आर्मी करिअरच्या विविध संधी, उपलब्धता व ट्रेनिंग याबद्दल माहिती देताना कर्नल पाटील यांनी सांगितले की, “आर्मीमध्ये करिअर करायचे असेल तर फिटनेस, कम्युनिकेशन स्किल, जनरल नॉलेज आणि योगा-मेडिटेशन यावर विद्यार्थिनींनी नक्कीच भर दिला पाहिजे. असे सांगत ‘Look like Officer, Walk Like Officer, Talk like Officer’ असा कानमंत्र त्यांनी दिला.

याप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाच्या प्राचार्य मेजर डॉ. मंगला साबद्रा यांनी “महाविद्यालयातील विद्यार्थिनींना एन. डी ए., एम. एम. एस. आणि इतर आर्मफोर्स सर्विसेस मध्ये करिअर करायचे असेल तर त्यांच्या ट्रेनिंगसाठी महाविद्यालयातर्फे मदत व मार्गदर्शन केले जाईल.” असे सांगितले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आर. एच. पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ जान्हवी तळेगावकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपप्राचार्य व्ही एस पाटील वाय. डी. देसले तसेच आई क्यू ए सी कॉर्डिनेटर डॉ. जे. व्ही धनविजय यांचे मार्गदर्शन लाभले.

Protected Content