सावखेडा सीम येथील मारूती मंदीराचा कायापालट

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील सावखेडा सीम येथील ७०० वर्षापुर्वीच्या मारूती मंदिराचा कायापालट करीत मुर्तीला काचेच्या पेटीत बंद करीत धार्मीक विधीनुसार पुजा करीत चांदीचा मुकूट चढविण्यात आला आहे. यासाठी गावातील तरूणाचा मोठा सहभाग दिसून आला.

 

आजच्या तरूणांमध्ये धार्मीक संस्कृती रूजविण्याची गरज सावखेडा सिम गावाप्रमाणे संपुर्ण महाराष्ट्राला आहे. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या या सावखेडा सिम या गावाच्या स्थापनेला ही  ७०० वर्षे पूर्ण झालीत. या गावात सातशे वर्षापूर्वी स्थापित केलेली हनुमंताची मूर्ती व मंदिर येथे आहे. मूर्तीवर शेंदूर मोठ्या प्रमाणात साचलेला असल्याने तो काढून मूर्तीला चांगच्या रूपात आणावे व मंदिराला पुनर्जीवित करावे, असा निर्धार गावातील काही तरुणांनी केला आहे. या तरुणांच्या कार्याला बघुन त्यांना प्रोत्साहन देत प्राऊड यांनी सहभाग घेतला. त्यानुसार मूर्तीचा शेंदूर काढून शेंदूर नदीपात्रात विविध पद्धतीने सोडण्यात आला आणि नव्याने मूर्तीला रूप आणले मूर्तीला चांदीचे डोळे आणि मुकुट बसवून काचेच्या पेटीत बंदिस्त केले. मंदिराला नवे रूप आणले.

 

५ फेब्रुवारी रोजी माघ शुद्ध पंचमीला दहिगाव येथील प्रवीण महाराज कुलकर्णी यांच्या हस्ते विधिवत मंत्रजप करून गावातील महेश पाटील, वैभव पाटील, सागर पाटील, केतन महाजन, अमोल महाजन, मिलिंद मोघे, बारकू पाटील यांच्याहस्ते पूजन करण्यात आले. २१ किलोचा पितळाचा घंटा अर्पण करणारे हर्षल मिलिंद महाजन यांच्याहस्ते घंट्याची  पूजा करण्यात आली व मंदीरात लावण्यात आला. यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

Protected Content