सावखेडा येथे आ. अनिल पाटील यांच्याहस्ते विकास कामांचे भूमीपूजन

 

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथे आ.अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नातून तलाठी कार्यालय आणि व व्यायामशाळेसाठी मंजूर झाल्याने या विकास कामांचे भूमीपूजन आमदार पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

 

तलाठी कार्यालयाचे भूमिपूजन जेष्ठ नागरिक रामलाल कदम यांचे हस्ते झाले तर व्यायामशाळेचे भूमिपूजन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते झाले. तलाठी कार्यालयसाठी २२ लक्ष व व्यायामशाळेसाठी १२ लक्ष निधी मंजूर झाला असून त्यातून ही कामे होणार आहे,याप्रसंगी आमदारांचे गावात जंगी स्वागत करण्यात आले. सत्कार सोहळ्यानंतर आमदारांनी ग्रामस्थांशी हितगुज करताना ग्रामविकास हेच आपले मुख्य धोरण असून गेल्या दोन तीन वर्षात मतदारसंघातील सर्व गावांना समान न्यायाचे धोरण ठेवले आहे,आज सत्ता बदल झाली असली तरी विकास कामांवर कोणताही फरक पडणात नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

यावेळी आमदार अनिल भाईदास पाटील यांचे सोबत जि.प.सदस्या जयश्री पाटील, एल.टी. पाटील, प्रा.सुरेश पाटील, उमाकांत साळुंखे तसेच सरपंच सौ.निकिता कदम, उपसरपंच लखन कदम, उपसचिव दिलीप कदम, रुपेश सोनवणे, बिपिन सोनवणे, मदनराव सोनवणे, भूषण कदम, चेअरमन पितांबर आबा, दिनेश कदम, माजी सरपंच हेमलता कदम, नाना मुसळी, भीमराव अहिरे, पिंटू अहिरे, जीभाऊ कदम, विनायक कदम, दिलीप कुलकर्णी, भीमराव अहिरे, श्याम कदम, प्रदीप कदम आदी असंख्य कार्यकर्ते व संस्थाचे पदाधिकारी हजर होते, सादर कार्यक्रम कार्यक्रम भवानी माता मंदिर येथे पार पडला. सूत्रसंचालन अनिल कदम यांनी केले.

Protected Content