यावल , प्रतिनिधी । येथील तालुका पोलीस स्टेशन पहील्याच पावसाच्या पाण्यात गळु लागल्याने गुन्हे संदर्भातील महत्वाची कागदपत्रांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातुन पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांनी अखेर स्वखर्चाने पोलीस स्टेशनच्या छताला प्लास्टीकची चादर टाकली आहे.
यावल पोलीस स्टेशनच्या गळणाऱ्या छताची पावसाळ्यापुर्वी दुस्ती व्हावी यासाठी पोलीस प्रशासनाने पाठपुरावा केला. मात्र, यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षीतपणामुळे हे काम होवु शकले नसल्याची खंत पोलीस निरिक्षक असण धनवडे यांनी व्यक्त केली. यावल तहसील कार्यालयाची जुनी इमारतील ११० वर्षा पेक्षाही अधिक कालावधी झाला आहे. काही दिवसापुर्वीच यावलचे तहसील कार्यालय हे नव्या प्रशासकीय इमारतीत स्थलांतरीत झाल्यानंतर तहसीलचे जुनी इमारत ही पुर्णपणे पोलीस स्टेशनकडे वर्ग झाली आहे. या शंभर वर्ष जुन्या इमारतीमधील पोलीस स्टेशनच्या मुख्य कार्यालयाची छत पावसाळ्यात गळु लागल्याने याची खबरदारी घेत पोलीस प्रशासनाने छत दुरुस्ती करणे संदर्भात मागणी पत्र सार्वजनिक बांधकाम विभाग यावल यांना दिले होते. मात्र, यासंदर्भात संबंधीत विभागाकडुन योग्य तो प्रतिसाद न मिळाल्याने अखेर पावसाळ्याचा संभाव्य धोका लक्षात घेता पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यानी पोलीस प्रशासनाच्या गुन्हे संदर्भातील महत्वाच्या कागदपत्रांच्या सुरक्षीतेच्या दृष्टीकोणातुन स्वखर्चाने पोलीस स्टेशनच्या कार्यालयीन छतला प्लास्टीक चादर आणुन टाकली आहे. पोलीस निरीक्षकांच्या या कार्याचे त्यांच्या सह कर्मचाऱ्यांमध्ये स्वागत करण्यात येत आहे.