पारोळ्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात 

पारोळा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरात श्रीकृष्ण जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

जनसेवक पीजी पाटील यांनी स्नान विळा अवसर पंचपकवानांचा उपहार व रात्री बारा वाजता महाआरती करून श्रीकृष्ण प्रभूंच्या जन्मदिवस साजरा करण्यात आला. सालाबादप्रमाणे यावर्षीही महानुभाव पंथातील दोनशे ते अडीचशे परिवाराने पारोळा शहरांमध्ये किर्तन भजनाने मोठ्या उत्साहात श्रीकृष्ण प्रभूंचा जन्मदिवस साजरा करण्यात आला.

महानुभाव पंथातील श्रीकृष्ण जन्माष्टमीचे परंपरा आजही अखंड चालू असून तालुक्यात जवळजवळ 1000 घर परिवार हा महानुभाव पंथांचा असून प्रत्येकाच्या घरी श्रीमंत असो या गरीब आपापल्या परीने छोट्या मोठ्या पद्धतीत विडा अवसर देखावा भजन कीर्तन भोजन अशाप्रकारे हा साजरा करण्यात आला.

दोन वर्षाचा कोरोना का अतिशय वाईट परिस्थितीत सर्वांचा गेला असल्या कारणनान यावर्षी भाविकांनी मोठी गर्दी केली होती असं कोरोना सारखं महाभयंकर संकट येऊ नये, अशी प्रार्थना सर्वांनी केली.

Protected Content