अडीच लाखांसाठी विवाहितेचा छळ

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । माहेरहून प्लॉट आणि रिक्षा घेण्यासाठी अडीच लाख रुपये आणावे, यासाठी विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण करत घरातून हाकलून दिल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत पाळधी पोलीस दुरक्षेत्र ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव शहरातील माहेर असलेल्या नूरजहा जाबीर देशपांडे यांचा विवाह धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील जाबीर गफार देशपांडे यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला, दरम्यान त्यांच्या संसार वेलीवर एक मुलगी आहे. मध्यंतरी जाबीर गफार देशपांडे यांनी विवाहितेला वडिलांकडून प्लॉट आणि रिक्षा घेण्यासाठी अडीच लाख रुपये आणावे यासाठी धमकावून शिवीगाळ व मारहाण केली. तसेच भिकारीची मुलगी असल्यामुळे फसून गेलो असे म्हणून तिला टोमणे मारणे सुरू केले. या छळा कंटाळून विवाहिता मुलीला घेऊन माहेरी धरणगाव येथे निघून आल्या.

या संदर्भात त्यांनी महिला दक्षता विभागाला तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीची दखल घेत पती जाबीर गफार देशपांडे, सासरे गफ्फार रसून देशपांडे, सासू अमिना गफार देशपांडे, इकबाल गफार देशपांडे, सुरैया इकबाल देशपांडे, समीर गफार देशपांडे, साबीर गफार देशपांडे, बशीर रसूल देशपांडे, नफीसा सलीम पटेल, फारुख देशमुख सर्व रा. पाळधी खुर्द ता. धरणगाव यांच्या विरोधात पाळधी खुर्द दूरक्षेत्र येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अरुण निकुंभ करीत आहे.

Protected Content