सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची बाधा

मुंबई प्रतिनिधी । राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांच्यासह त्यांच्या संपर्कातील एकूण पाच जणांचे चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

राज्य सरकारमध्ये याआधी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि सार्वजनीक बांधकमा मंत्री अशोक चव्हाण या मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती. दोघांनी या विषाणूवर यशस्वीपणे मात केली आहे. यानंतर ठाकरे सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना देखील कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या वाहनाचा चालक आणि संपर्कातील अन्य अशा एकूण पाच जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. या सर्वांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. धनंजय मुंडे हे बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत सहभागी झाले होते. यामुळे आता त्यांच्या संपर्कातील मंत्री व अधिकार्‍यांचीही चाचणी घेण्यात येईल अशी शक्यता आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यासह ज्या पाच जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले यापैकी कुणालाही कोरोनाची बाह्य चिन्हे दिसून आली नसल्याची माहिती मिळाली आहे. परिणामी ते या विषाणूवर यशस्वीपणे मात करतील असा विश्‍वास आहे.

Protected Content