सामाजिक कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर आयुध निर्माणीतील दोघांवर कारवाई

 

भुसावळ, प्रतिनिधी तालुक्यातीलवरणगाव आयुध निर्माणीच्या गेट मधु दारूची वाहतूक होत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते संजय खन्ना यांनी केली होती.यात नुकतेच दोघा कर्मचाऱ्यांना दारूच्या ३५ बाटल्या आतमध्ये नेतांना पकडण्यात येऊन महाप्रबंधकानी या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली.

सविस्तर वृत्त असे की,वरणगाव आयुध निर्माणीमध्ये युनियनची निवडणूक सुरू असतांना आयुध निर्माणीमध्ये ओली पार्टी रंगत होत्या. तसेच निवडून येण्यासाठी कर्मचाऱ्यांना दारूचे आमिष दाखविण्यात येत असल्याने रोज गेट मधून दारू जात असल्याचे तक्रार सामाजिक कार्यकर्ते संजय खन्ना यांनी केली होती. यानंतर दिनांक १८ डिसेंबर रोजी वरणगाव आयुध निर्माणीच्या गेटवर दोन जणांना आत दारू नेतांना पकडण्यात आले होते. आयुध निर्माणीत आलेले नूतन महाप्रबंधक सुशांत कुमार राऊत यांनी दि. २४ डिसेंबर रोजी दोघा कर्मचाऱ्यांवर कारवाई केली असल्याची माहिती खन्ना यांनी दिली. वरणगाव आयुध निर्माणीमध्ये असे अनेक भ्रष्ट्राचार झालेले असून याबाबत खन्ना हे लवकरच महाप्रबंधक यांच्याकडे कारवाईसाठी तक्रार करणार आहे. महाप्रबंधक यांनी केलेली कारवाई कैतुकास्पद असून माजी महाप्रबंधक चर्टजी यांच्या कारकिर्दीत झालेले प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी खन्ना यांनी केली आहे.

Protected Content