मुक्ताईनगर प्रतिनिधी । तालुक्यातील सातोड गावातील एका शेतकऱ्याच्या खळ्यातून शेती उपयोगी वस्तूची चोरी करणाऱ्या एकावर मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील सातोड गावातील रहिवाशी गणेश विनोद नाफडे (वय-२७) हे तरूण शेतकरी आहे. त्यांची शेती असल्याने गावाच्या लगत असलेल्या खळ्यात शेतीसाठी लागणारे साहित्य तिथेच ठेवतात. गावातील रहिवाशी असलेला प्रमोद प्रल्हाद भिल यांने सोमवारी ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास खळ्या ठेवलेले १० हजार रूपये किंमतीचे ट्युबवेल, बाराशे रूपये किंमतीचे ट्रॅक्टरचे टापलिंग, दोन हजार रूपये किंमतीचे बांधकामासाठी लागणारे आसारी आणि १ हजार ६०० रूपये किंमतील लोखंडी नांगराची पास असा एकुण १४ हजार ८०० रूपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला. शेतकरी गणेश नाफडे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी प्रमोद भिल यांच्या विरोधात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अद्याप संशयित आरोपीस अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास स.फौ. मानिक निकम करीत आहे.