पिंपळगाव प्रतिनिधी । येथून जवळ असलेल्या सातगाव डोंगरी येथे बेकायदेशीर गावठी दारू विक्री करणाऱ्या तिघांवर अटक करत त्यांच्या ताब्यातील ५५ लिटर दारू हस्तगत केली. तिघांवर पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सातगाव डोंगरी गावात काही नागरीक बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू विक्री करत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार, पिंपळगाव पोलीसांनी ५ एप्रिल २०२० रोजी दुपारी धाड टाकत संशयित आरोपी आलुद्दीन सुभान तडवी, सुपडू बुध तडवी, फिरोज शहा दगडू शहा सर्व रा. सातगाव डोंगरी यांना दारू विक्री करत असतांना रंगेहात पकडले. त्यांच्या ताब्यातील ५५ हजार रूपयांची दारू हस्त गेली. तिघांवर पिंपळगाव हरेश्वर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी केलेल्या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे ढाबे दणाणले.
यांनी केली कारवाई
सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ राजेंद्र पाटील, पो.कॉ. सचिन पवार, पो.कॉ. संभाजी सरोदे, सातगाव डोंगरी येथील पोलीस पाटील दत्तु पाटील यांनी ही कारवाई केली.