साकळी येथील प्रसूती गृहाबाबत दिशाभूल करणारी माहिती-जंजाळे

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील साकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रसूतीगृहाचे काम हे एनआरएचएम अंतर्गत झाले असून यात जिल्हा परिषदेच्या निधीचा वापर करण्यात आला नसल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते मिलींद जंजाळे यांनी केला आहे. तर आरोग्य सभापती रवींद्र सूर्यभान पाटील यांनी या कामासाठी आपणच पाठपुरावा केले असल्याचे प्रत्युत्तर दिले आहे.

 

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील साकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उभारण्यात आलेल्या प्रसूती गृहाबाबत सामाजिक कार्यकर्ते मिलींद जंजाळे यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून आरोप केले आहेत. यात म्हटले आहे की, साकळी येथिल प्राथमिक आरोग्य केंद्र शासन निर्णयानुसार सुसज्ज प्रसूती गृह वाढीव ईमारत बांधकामा बाबत विद्यमान जि प सदस्य तथा आरोग्य सभापती रविंद्र सूर्यभान पाटील व काही साकळी गावातील स्थानिक पदाधिकारी सदरील प्रसूती गृह आम्ही जि. प. निधीतून केलेले आहे असे सांगून चक्क जनतेची दिशाभुल करीत आहे का याबाबत शंका निर्माण झाली आहे.

या संदर्भात आपण स्वत: संबंधित जिल्हा आरोग्य अधिकारी आरोग्य विभाग जिल्हा परिषद जळगांव यांच्याकडे दिनांक:-३१/०५/२०२१ रोजी लेखी स्वरूपात अर्ज दाखल केला होता. सदर अर्जात सदरील प्रसूती गृहाची इमारत बांधकाम कश्या प्रकारे मंजूर आहे आणि त्यासाठी कोणी पाठपुरावा केला आहे का व ती कोणी मंजूर केली अशी माहिती मागितली होती. या अर्जावर संबंधित आरोग्य विभागा कडून दिनांक :-१०/०६/२०२१ रोजी लेखी स्वरूपात माहिती प्राप्त झाल्याने त्या पत्रानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र साकळी तालुका यावल जिल्हा जळगांव अंतर्गत प्रसूती गृह वाढीव बांधकामच्या मंजुरी बाबत शासन निर्णय देण्यात आलेला असुन सदरचे बांधकाम हे राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजेच एनआरएचएम अंतर्गत १३ व्या वित्त आयोग मधुन मंजूर आहे. असे सांगण्यात आले आहे. 

 

तरी सुद्धा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य तथा आरोग्य सभापती व गावातील काही स्थानिक पदाधिकारी खोटे नाटे बोलुन जनतेची दिशाभूल का करीत आहेत. त्याच प्रमाणे संबंधित पदाधिकारी यांनी सदरील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मंजूर झालेल्या बांधकामावर नेमणूक असलेल्या शिंदे नमक अभियंता यांच्यावर भूमिपूजन समयी दबाव आणून भूमिपूजन ठिकाणी आलेल्या जनते समोर आम्ही जि. प. निधीतून मंजूर केलेले आहे असे सांगण्यास भाग पाडले तरी प्रसूती गृह वाढीव बांधकामाच्या मंजुरी विषयी पुरावा असुन संबंधित विद्यमान जिल्हा परिषद सदस्य तथा आरोग्य सभापती रविंद्र सूर्यभान पाटील व साकळी गावातील काही स्थानिक पदाधिकारी यांनी स्वतःच्या फायद्या साठी प्रसूती गृह आम्ही मंजुर करून आणले असे सांगून श्रेय घेऊ नये आणि जनतेची दिशाभुल करू नये असे असे आवाहन मिलिंद जंजाळे यांनी केले आहे.

 

या संदर्भात आरोग्य सभापती रवींद्र सुर्यभान पाटील म्हणाले की, साकळी येथील वाढीव प्रसुतीगृहाकरीता जिल्हा प्रशासनाकडे मी वारंवार पाठपुरावा केलेला आहे. यात कुठलीही शंका नाही.

जिल्हा परिषदेमध्ये विविध विकास कामांसाठी एकच विभागातून निधी उपलब्ध होत नाही तर वेगवेगळ्या विभागातून निधी उपलब्ध होत असतात. सर्व संबंधित प्रस्ताव जिल्हा परिषदेने मधूनच जात असतात. त्यासाठी पाठपुरावा करणे फक्त महत्त्वाचे आहे. कुठल्याही कामांच्या वर्कऑडरवर नाव नसते. प्रसूतीगृहाच्या बांधकामासाठी जि.प.मार्फत निधी दिलेला आहे.गटात विविध विकास कामे करणे माझे कामच असून आरोग्याच्या कामास मी प्रथम प्राधान्य देतो.तसेच मीच काम आणलेले असल्याने मला श्रेय घेण्याची गरज नाही.गटाचा विकास डोळ्यात अंजन भरल्यासारखं झालेला आहे त्यामुळे कोणीही काही आरोप केले तरी साकळी- दहिगाव गटाचा सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे रवींद्र पाटील यांनी नमूद केले आहे.

Protected Content