सांगवीत प्रेमप्रकरणातून तरुणाची निर्घुण हत्या !

 

पिंपरी चिंचवड (वृत्तसंस्था) आपल्या मुलीवर प्रेम करतो या रागातून एका तरुणाची एकाच कुटुंबातील सहा जणांनी मिळून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना पिंपरी चिंचवडमधील सांगवी परिसरातील घडली आहे.

 

पिंपरी चिंचवडमधील सांगवी परिसरातील पिंपळे सौदागर मध्ये ही घटना घडली आहे. मयत तरुण विराज जगताप हा आरोपी जगदीश काटे यांच्या मुलीवर प्रेम करत होता. विराज आपल्या मुलीवर प्रेम करतो ही गोष्ट लक्षात आल्यानंतर मुख्य आरोपी हेमंत काटे, सागर काटे आणि अन्य 4 आरोपींनी विराजवर हल्ला केला. आरोपी हेमंत काटे, सागर काटे, जगदीश काटे, रोहित काटे, कैलास काटे आणि हर्षद काटे या आरोपींनी लोखंडी रॉड आणि दगड घेऊन विराजला बेदम मारहाण केली. बेदम मारहाणीमुळे विराज जागेवर बेशुद्ध पडला. विराज बेशुद्ध पडल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. जखमी बेशुद्ध अवस्थेत विराजला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Protected Content