सहा डॉक्टर्सला गणपती रूग्णालयात रूजू होण्याचे निर्देश

जळगाव प्रतिनिधी । शहरातील गणपती हॉस्पीटलला कोविड रूग्णालयात म्हणून घोषीत करण्यात आले असून येथील रूग्णसंख्या वाढत असल्याने जिल्ह्यातील सहा डॉक्टर्सला येथे तातडीने रूजू होण्याचे निर्देश जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिले आहेत.

याबाबत वृत्त असे की, जिल्हा प्रशासनाने आधीच गणपती हॉस्पीटलला अधिग्रहीत केले असून याला कोविड रूग्णालय म्हणून कार्यरत केले आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आता वेगाने वाढू लागला असल्यामुळे वैद्यकीय अधिकार्‍यांची आवश्यकता वाटू लागली आहे. या अनुषंगाने आज नेरी (ता. जामनेर) येथील डॉ. नरेश पाटील; बेटावद येथील राजेश एस. जैन, धामणगाव येथील डॉ. विक्रमसिंह घोगले, वरखेडी (ता. पाचोरा) येथील डॉ. शांताराम ठाकूर, थोरगव्हाण येथील डॉ. राजेंद्र टिके व सावखेडा येथील डॉ. नसीमा याकूब तडवी यांना तातडीने गणपती हॉस्पीटलमध्ये रूजू होण्याचे निर्देश दिले आहेत.

Protected Content