जळगाव प्रतिनिधी l सहकार क्षेत्रामध्ये आपल्या भागामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल संजय पवार यांना मुंबईत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याहस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने गौरवण्यात आले.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे संचालक तसेच जळगाव जिल्हा सहकारी कॉटन मार्केटिंग फेडरेशनचे चेअरमन म्हणून संजय पवार काम पाहत आहे. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांच्या शैक्षणिक दिवसानिमित्त राजभवन मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंगजी कोश्यारी यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या समाजसेवकांना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार देण्यात आला. यात जळगाव जिल्ह्यातील शेती व सहकार क्षेत्रामध्ये काम करणारे संजय पवार यांचा देखील समावेश होता.
सदरचा पुरस्कार शनिवारी मुंबई येथे राज्यपाल यांच्या हस्ते देण्यात आला संजय पवार यांनी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळोवेळी शेतकऱ्यांच्या गरजा भागवण्याचे काम केलेले आहे त्याप्रमाणे जळगाव जिल्हा सहकारी मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सभासदांना रासायनिक खतांचा पुरवठा केलेला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्या वतीने कोविड 19 महामारी मध्ये लॉकडाउन असताना देखील शेतकऱ्यांचा कापूस शासकीय खरेदी केंद्रावर खरेदीसाठी विशेष प्रयत्न केलेले आहेत या सगळ्या गोष्टींचा विचार करून संजय मुरलीधर पवार यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने पुरस्कार देण्यात आलेला आहे या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.