भरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कुसुंबा बसस्थानकाजवळ भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बुधवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात कारवरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सागर मनोहर जगताप (वय-२५) रा. सुरेशदादा जैन नगर, कुसुंबा हा तरूण मंगळवारी २४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता त्याचा मित्र मनोज पाटील यांच्या सोबत दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीई ७८५९) ने कसुंबा बसस्थानक येथून जात असतांना मागून भारधाव वेगाने येणारी कार क्रमांक (एमएच १२ व्ही १४४६) ने जोरदार धडक दिली.

या धडकेत दुचाकीवरील सागर जगताप आणि मनोज पाटील हे दोघे गंभीररित्या जखमी झाले. त्यांना जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी सागर जगताप यांनी दिलेल्या फियार्दीवरून बुधवारी २५ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात कारवरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गफुर तडवी करीत आहे.

 

Protected Content