सविधानामुळेच देश महासत्ता होणार – ॲड. अर्जुन पाटील

बोदवड – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | सविधांनामुळेच लोकशाही बळकट झाली आहे. सविधांनामुळेच समाजाचा सर्वांगिण विकास झाला आहे. असे प्रतिवादन ॲड. अर्जुन पाटील यांनी आज सविधांन दिनानिर्मित बोदवड न्यायालयात आयोजित कार्यक्रमात केले.

आज बोदवड येथिल दिवाणी व फौजदारी न्यायालयात सविधान दिनानिमित्त सकाळी 10 वाजता कार्यक्रमाचे व रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

न्यायालयात सविधांन उद्देशिकाचे ॲड. अर्जुन पाटील यांनी उद्देश पत्रिकेचे सामूहिक वाचन केले व सर्वाना सविधांनाच्या उद्देशिकेचे वाटप करण्यात आले. सविधांनास नमन व पुजन करण्यात आले. या वेळी झालेल्या कार्यक्रमात बोदवड वकिल संघाचे उपाध्यक्ष धनराज प्रजापती यांनी “सविधांन आणि न्यायालयाचे महत्व” या विषयावर अभ्यासपुर्ण विचार मांडले. तसेच ॲड. के.एस. इंगळे यांनी सविधांनवर गाणे गायले. तसेच बोदवड न्यायालयाचे न्यायाधिश सरवरी यांनी आपले अध्यक्षीय विचार मांडले.

यावेळी बोदवड न्यायालय ते आंबेडकर चौक पर्यत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅली सविधांन विषय जनजागृती करण्यासाठी विविध घोषवाक्य असलेले फलक हाती घेण्यात आले होते.

सदर रॅलीत बोदवड वकिल संघाचे अध्यक्ष- ॲड.अर्जुन पाटील, उपाध्यक्ष- ॲड.धनराज प्रजापती, ॲड. विकास शर्मा, ॲड.दिपक झांबड, ॲड.मिनल अग्रवाल, ॲड.आय.डी.पाटील, ॲड.सी.के.पाटील, ॲड.श्रृती सिखवाल, ॲड.चांगदेव दांडगे, व न्यायालयीन कर्मचारी आठवले नाना, समन्वयक शैलेश पडसे, स्टेनो मानकर, न्यायालयीन कर्मचारी वर्ग, बेलिफ वर्ग, शिपाई वर्ग, केस वॉच – राजेश महाजन, पो.कॉ. संतोष चौधरी, पो.कॉ. शशिकांत शिंदे, अगंणवाडी सेविका प्रमुख इंगळे ताई याचेसह सर्व अगंणवाडी सेविका, बोदवड तालुक्यातील नागरिक बंधु-भगिनी यांनी रॅलीत सहभाग घेतला.

सदर कार्यक्रमात सविधांन या विषयावर आपले विचार माडताना पुढे म्हणाले की, भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान तर आहेच; परंतु अनेक जाती, अनेक धर्म, अनेक पंथ व अनेक रूढी-परंपरा या सर्वांना न्याय देणारे व सर्व समाज घटकांना विकासाच्या प्रवाहात आणणारे संविधान आहे. त्यात वेळ, काळानुरूप दुरुस्ती करण्याची तरतूद आहे. त्यामुळे संविधान हे नेहमी नव्या युगाचे नायक असल्यासारखे आपणास दिसते. संविधान कायद्याचे उगमस्थान असल्याचे प्रतिपादन तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅड. अर्जुन पाटील यांनी केले. संविधान दिनानिमित्त येथील न्यायालयात आयोजित कार्यक्रमात केले.

Protected Content