सवाद्य औक्षणासह पुष्पाचा वर्षाव करून शाळा प्रवेशोत्सव साजरा

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालक्यातील आमोदे येथील  घन:श्याम काशीराम विद्यालयात शासन निर्णयानुसार शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमोदे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष उमेश भाऊ पाटील  होते.

 

शाळा प्रवेशोत्सवावेळी विद्यालयातील शिक्षिकांनी विद्यार्थ्यांना औक्षण करीत  फुलांचा वर्षाव करून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. शालेय समिती चेअरमन  ललित महाजन यांच्या हस्ते नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन सत्कारित करण्यात आले. विद्यार्थी मोठ्या आनंदाने  स्वागताचा स्विकार करीत होते.

 

याप्रसंगी इयत्ता १० वी मध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थिनींचा संस्थेच्या व शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रथम आलेली डिंपल प्रकाश सरोदे हिचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष उमेश भाऊ पाटील यांनी केला तर द्वितीय क्रमांक प्राप्त आम्रपाली नवल तायडे हिचा सत्कार संस्थेचे उपाध्यक्ष  श्री विनायक पाटील यांच्या हस्ते तर तृतीय आलेली मानसी नंदलाल जावरे या विद्यार्थिनीचा सत्कार संस्थेचे चिटणीस प्रा. उमाकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

 

इयत्ता पाचवी ते आठवी वर्गाच्या विद्यार्थ्यांना संस्थाचालकांच्या हस्ते शासन स्तरावरून मिळालेली क्रमिक अभ्यासाची पुस्तके वितरित करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी शासन योजनांचा योग्य आदर ठेवून प्रगती करण्याचे आवाहन प्रा. उमाकांत पाटील यांनी केले तर मुख्याध्यापक एस बी बोठे यांनी मुलांना शाळेच्या प्रथम दिवशी अभ्यास विषयक विधायक कार्य करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले कार्यक्रमास संस्थेचे माननीय संचालक एकनाथ लोखंडे, सुभाष महाजन, वैभव चौधरी, धनराज चौधरी, नामदेव पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वर चौधरी सर यांनी केले तर आभार चारुलता महाजन मॅडम यांनी मानले. सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Protected Content