सलग 20व्या दिवशी पेट्रोल-डिझेलची दरवाढ कायम !


नवी दिल्ली (वृत्तसंस्था)
पेट्रोलियम कंपन्यांनी आज शुक्रवारी सलग 20व्या दिवशी पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ केली आहे. यानुसार पेट्रोल २१ पैसे तर डिझेल १७ पैशांनी महागले आहे.

 

 

गेल्या २० दिवसांपासून पेट्रोल दरवाढीचे सत्र मात्र कायम आहे. दरम्यान, आज दिल्लीत पेट्रोलच्या दरात २१ पैशांची तर डिझेलच्या दरात १७ पैशांची वाढ करण्यात आली. या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोलचे दर ८०.१३ रूपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ८०.१९ रूपये प्रति लिटर इतके झाले आहेत. तर मुंबईत पेट्रोलचे दर ८६.९१ रूपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर ७८.५१ रूपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे ८३.३७ रूपये प्रति लिटर आणि ७७.४४ रूपये, तर कोलकात्यातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होऊन ते अनुक्रमे ८१.८२ रूपये प्रति लिटर आणि ७५.३४ रूपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. तर बंगळुरूमध्ये पेट्रोलचे दर ८२.७४ रूपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर ७६.२५ रूपये प्रति लिटरवर गेले आहेत. दरम्यान, दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे दर बदलतात. सकाळी 6 वाजल्यापासून नवी दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते.

Protected Content