सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या हिताचा – निलेश भोईटे

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्या. या संस्थेचे म.को, ऑडिनेशन कमेटीची सभा संस्थेच्या कार्यालयात चेयरमन गोकुळ पितांबर पाटील यांचे अध्यक्षतेखाली पार पडली.

 

आजच्या सभेत मुख्यत सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला संदर्भात चर्चा विनीमय करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा आपल्या संचालक मंडळाच्या हितासाठी कसा प्रकारे चांगला आहे, याविषयी संस्थेचे मानद सचिव निलेश रणजित भोईटे यांनी सभेसमोर मांडले. नुकत्याच जाहीर झालेल्या १२ वी च्या निकाला संदर्भात सर्व शाखांचा आढावा घेण्यात आला. वरील सभा न होण्यासाठी विजय पाटील यांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती. मात्र तरी ही सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेस संस्थेचे चेअरमन गोकुळ पाटील, मानद सचिव निलेश भोईटे, संचालक जयंत देशमुख, कर्मचारी संचालक महेंद्र भोईटे यांच्यासह सभेला जिल्ह्यातील २५ मुख्याध्यापक प्राचार्य उपस्थितीत होते.

Protected Content