संक्रमण वाढण्यापूर्वीच प्रतिकारासाठी सर्वांचे प्रयत्न गरजेचे – पंतप्रधान

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – करोना संसर्ग संकट अजून गेलेले नाही. अन्य देशांच्या मानाने भारतात संसर्ग परिस्थिती चांगली हाताळली असून लसीकरणामुळे हे शक्य झाले आहे. आता लहान मुलांचे लसीकरण ही आता प्राथमिकता असून संसर्ग संक्रमण वाढण्यापूर्वीच सर्वांनी सतर्क राहून प्रतिकारासाठी प्रयत्न गरजेचे आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

काही राज्यांसह देशात करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक घेतली. देशात करोना संसर्गाचा केंद्र आणि राज्यांनी एकत्रित सामना केला असून सर्वच राज्यात एकत्रित प्रयत्नांमुळे शक्य  झाले आहे, आरोग्य विषयक पायाभूत सुविधा आगामी काळात देखील कार्यरत रहावीत, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीत म्हटले आहे.

लहान मुलांचे लसीकरण ही आता प्राथमिकता

विशेषत: सर्वच राज्यात लसीकरणामुळे संसर्ग आटोक्यात आला असून तिसऱ्या लाटेत जास्त केसेस असतानाही सर्वसामन्यांचे दैनदिन व्यवहार सुरु होते. ते असेच पुढे सुरु राहिले पाहिजे. संक्रमण वाढ होऊ नये यासाठी सुरुवातीलाच ते रोखण्यासाठी राज्यातील रुग्णालयांचे सुरक्षा व्यवस्था यंत्रणेचे ‘सेफ्टि ऑडिट’ करा. तेव्हा संभाव्य दुर्घटनेपासून वाचता येईल, यासाठी सर्वांनी एकत्रित काम करणे गरजेचे असून यापुढे लहान मुलांचे लसीकरण ही आता प्राथमिकता असल्याचेही ते म्हणाले.

देशहितासह सर्वसामान्यांसाठी व्हॅट कमी करा
या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशहितासह सर्वसामान्यांसाठी किमान सहा महिन्यांसाठी का होईना व्हॅट कमी करा असे म्हणत काही राज्यांनी इंधनाचे दर कमी केलेले नाहीत. हे एक प्रकारे त्या राज्यातील लोकांवर अन्याय असून इंधन दरांवरुन महाराष्ट्राला सुनावले. मोदींनी इंधनवारील व्हॅट कमी न करण्याच्या राज्यांची थेट नावच घेतली आणि खडे बोल सुनावले. कोलकाता, हैद्राबाद, चैन्नई, मुंबई, जयपुर येथे त्या राज्यांनी व्हॅट कमी न केल्याने इंधनाचे दर कमी झालेले नाहीत. सर्वसामान्य नागरिक तसेच देशहितासाठी सहा महिन्यांनी का होईना व्हॅट कमी केला पाहिजे,” असा सल्ला यावेळी पंतप्रधान मोदी यांनी दिला.

Protected Content