Home प्रशासन नगरपालिका तळवेलच्या पाटील बंधूंचा सामाजिक उपक्रम ; वरणगावकरांसाठी स्वर्गरथ सेवा सुरू

तळवेलच्या पाटील बंधूंचा सामाजिक उपक्रम ; वरणगावकरांसाठी स्वर्गरथ सेवा सुरू

0
10


वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वरणगाव शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची आणि समाजोपयोगी सुविधा उपलब्ध झाली आहे. तळवेल येथील पाटील बंधूंनी सामाजिक बांधिलकी जपत शहरासाठी अत्याधुनिक स्वर्गरथ (वैकुंठ रथ) उपलब्ध करून दिला आहे. आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ हा उपक्रम राबविण्यात आला असून, नागरिकांकडून या कार्याचे स्वागत करण्यात येत आहे.

तळवेल येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक पाटील आणि रविंद्र पाटील यांनी कै. नारायण सिताराम पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा स्वर्गरथ सेवेत दाखल केला. वरणगाव व परिसरातील नागरिकांशी त्यांचे असलेले जिव्हाळ्याचे नाते आणि सामाजिक कार्याची प्रेरणा लक्षात घेऊन हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

अंत्यविधीच्या प्रसंगी नागरिकांना वाहन व्यवस्थेसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही गरज ओळखून पाटील बंधूंनी स्वर्गरथाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सेवेमुळे नागरिकांना अत्यंत आवश्यक वेळी मदत मिळणार आहे.सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे वरणगाव शहरात एक सकारात्मक संदेश गेला आहे. नागरिक, सामाजिक संस्था आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पाटील बंधूंच्या या सेवाभावी कार्याचे कौतुक केले आहे. कै. नारायण पाटील यांच्या आठवणी जपण्यासोबतच समाजासाठी उपयुक्त ठरणारी सुविधा निर्माण करण्याचा हा प्रयत्न असून, सामाजिक बांधिलकीचे हे उदाहरण प्रेरणादायी ठरत आहे.


Protected Content

Play sound