एरंडोल, प्रतिनिधी । सर्व जातीधर्माच्या लोकांना एकत्र घेऊन चालणारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष प्रा.मनोज पाटील यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहन करतांना केले.
याप्रसंगी एरंडोल विधानसभा क्षेत्र प्रमुख पराग पवार, जेष्ठ नगरसेवक डॉ.सुरेश पाटील, माजी प्राचार्य ए.आर.पाटील, जिल्हासरचिटणीस डॉ. राजेंद्र देसले, राजेंद्र शिदे, युवक जिल्हा सरचिटणीस संदीप वाघ, युवक तालुकाध्यक्ष किशोर पाटील, जिल्हा सरचिटणीस अँड. अहमद सय्यद, रविंद्र पाटील, दशरथ चौधरी, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस बबलु पहेलवान, अशपाक बागवान, उमेश पाटील, युवक जिल्हा सरचिटणीस कपिल पवार, ईश्वर बिऱ्हाडे, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष विकास साळुंखे, ओ.बी.सी.सेल शहराध्यक्ष डाँ. प्रशांत पाटील, योगराज महाजन, दिपक अहिरे, गुंजन चौधरी, युवक शहराध्यक्ष नरेश भोई, एन. डी. पाटील, नरेश भोई व सर्व फ्रंटलचे पदाधीकारी कार्यकर्ते उपस्थीत होते.