मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – भोंग्याच्या संदर्भात कायदा व सुव्यवस्थाबाबत चर्चेसाठी महाविकास आघाडी सरकारने बोलावलेल्या लाऊडस्पीकरबाबत मार्गदर्शक तत्वे ठरविण्याच्या बैठकीस बहुतांश प्रमुख नेते अनुपस्थिती राहण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे.
महाविकास आघाडी सरकारने उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज सोमवारी राज्यातील सर्व राजकीय पक्ष प्रमुखांची बैठक आयोजित केली आहे. सरकारने धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरबाबत मार्गदर्शक तत्वे ठरवण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीला सर्वच पक्ष उपस्थित राहण्यास संमती दिली असली तरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. या बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. इतकेच नव्हेतर या सर्वपक्षीय बैठकीस वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील हे देखील अनुपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. या सर्वपक्षीय बैठकीस मनसेच्या वतीने संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
सर्वच पक्ष प्रमुखांची ‘भोंगा’ मार्गदर्शक बैठकीस दांडी
3 years ago
No Comments