पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील गाळण बु” येथील शेतकरी भिकन काळे (वय-४८) हे शेतातील रान डुक्करांना हाकलून लावण्यासाठी १९ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास शेताकडे गेले होते. राञी शेताची राखण करतांना भिकन कोळी यांना विषारी जातीच्या सर्पाने दंश केला. दरम्यान ग्रामस्थांच्या मदतीने भिकन कोळी यांना उपचारासाठी पाचोरा येथे नेत असतांना वाटेतच त्यांचा मृत्यु झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मयत शेतकरी भिकन काळे यांनी शेतात मका पिक लावले होते. शेतात गेल्या काही दिवसांपासुन रान डुक्कारांनी घुसुन पिकाचे नासधुस सुरू केली होती. शेतातील मक्याची राखण करत असतांनाच रानडुक्करांना पळवून लावण्याच्या नादात शेतातील मक्याच्या शेतातून जातांना सकाळी साडे तीन वाजेच्या सुमारास त्यांना विषारी जातीच्या सापाने चावा घेतला. ही बाब लक्षात येताच त्यांनी घर गाठले व तात्काळ ग्रामस्थांच्या मदतीने उपचारासाठी पाचोरा निघाले असतांनाच त्यांचा वाटेतच दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेबाबत पाचोरा – भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांना ही घटना माहीत पडताच त्यांनी शहर प्रमुख किशोर बारावरकर यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात पाठवून पाहिजे ती मदत करण्याचे सांगितले. त्यानुसार किशोर बारावरकर यांनी योग्य ती मदत करत काळे कुटुंबीयांचे सांत्वन करुन कुंटुंबायांना धीर दिला. मयत भिकन बारकु काळे हे अल्पभूधारक शेतकरी असल्याने आर्थिक परिस्थिती जेमतेम असून यांच्या पाश्चात्य पत्नी, दोन मुले, असा परिवार आहे. यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याकारणाने त्यांना शासनाकडून त्वरित आर्थिक मदत मिळावी अशी मागणी होत आहे. भिकन कोळी यांच्या आकस्मीक मृत्यूने गाळण बु” सह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.