किरकोळ कारणावरून तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील भादली खुर्द गावात किरकोळ कारणावरून एका तरुणाला त्याच्या कुटुंबाला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेबाबत शुक्रवारी १७ मार्च रोजी रात्री ९ वाजता तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सतीश सुखदेव सोनवणे (वय-३२, रा. भादली खुर्द ता.जि.जळगाव) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मजुरीचे काम करून तो उदरनिर्वाह करतो. गुरुवारी १६ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता गावातील मराठी शाळेजवळ किरकोळ कारणावरून सतीश सोनवणे याला गावात राहणारा समाधान एकनाथ कोळी याने मारहाण केली. तसेच सतीश सोनवणे याच्या आई-वडील व पत्नी यांना शिवीगाळ केली. तसेच त्याने हातातील लाकडी दांडका सतीश सोनवणे यांच्या डोक्यावर व पायावर मारून गंभीर दुखापत केले. ही घटना घडल्यानंतर सतीश सोनवणे यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्याने दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी समाधान कोळी यांच्या विरोधात शुक्रवार १७ मार्च रोजी रात्री ९ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक किरण अगोणे करीत आहे.

Protected Content