सराईत दुचाकी चोरट्याला बेड्या; चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । जळगाव शहरातील वेगवेगळ्या भागातून दुचाकींची चोरी करणारा भामट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्यांच्या ताब्यातून चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत केल्या आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, जळगाव शहरातील वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरीच्या घटना घडल्या आहे. संशयित आरोपी रूपेश संजय पाटील रा. साखरे ता. धरणगाव हा त्याच्या साथीदारासह जळगाव शहरात दुचाकींची चोरी करत असल्याचे गोचोरी करत असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक फौजदार अशोक महाजन, युनुस शेख, रमेश जाधव, पोलीस हवलदार विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, संदीप साबळे, पोना राहुल पाटील, नितीन बाविस्कर, अविनाश देवरे, ईश्वर पाटील, प्रविण मांडोळे, उमेश गोसावी, हेमंत पाटील, दिपक शिंदे, मुबारक देशमुख यांनी सापळा रचुन संशयित आरोपी रूपेश पाटील याला अटक केली. त्याच्या कडून चोरीच्या एकुण पाच दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

त्याने दिलेल्या कबुलीतून व हस्तगत करण्यात आलेल्या चोरीच्या दुचाकीच्या माध्यमातून जळगाव जिल्हापेठ पोलिस स्टेशनमधील २, जळगाव शहर पोलिस स्टेशनमधील २ व पंचवटी पोलिस स्टेशन नाशिक येथील एक असे एकुण ५ मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पुढील तपासकामी त्याला जिल्हापेठ पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Protected Content