रिंगरोड येथे प्रौढाच्या हातातून मोबाईल दुचाकीवरील दोघांनी लांबविला

जळगाव प्रतिनिधी । शहरातील रिंगरोडच्या रस्त्याने मोबाईलवर बोलत पायी जाणाऱ्या प्रौढाच्या हातातून दोन जणांनी हिसकावून दुचाकीने पळ काढल्याची घटना रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, रविंद्र सिताराम तायडे (वय-५०) रा. हरेश्वर नगर जळगाव हे खासगी नोकरीला आहे. सोमवारी २१ डिसेंबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर पडले, शहरातील रिंगरोडवरील संवेदनशिल मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल समोरून मोबाईलवर बोलत पायी जात असतांना मागून दुचाकीवर येवून अज्ञात चोरट्यांनी हातातील १५ हजार रूपये किंमतीचा मोबाईल हिसकावून पळ काढला. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीसात धाव घेवून हकीकत सांगितली. रविंद्र तायडे यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि मगन मराठे करीत आहे.

Protected Content