सरसकट लॉकडाऊन नाही पण निर्बंध कडक करू — आरोग्यमंत्री टोपे

 

मुंबई : वृत्तसंस्था । आम्ही लॉकडाऊन करणार नाही. मुंबई आणि राज्यात लॉकडाऊन लावण्याचे कारण नाही. पण शिस्त लावण्यासाठी कठोर निर्बंध लावणार”, अशी भूमिका आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  घेतली आहे

“टॅकिंग, ट्रेसिंग, टेस्टिंग या तीन सूत्रांवर काम करतोय. सर्व सामाजिक, शासकीय कामांना निर्बंध घातले आहेत. काही ठिकाणी नाईट कर्फ्यू , लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन हा काही पर्याय नाही , असेही ते म्हणाले . 

‘“कोरोना रूग्ण संख्या वाढतेय. संसर्ग वाढतोय, ही वाढ मागच्या तुलनेत कमी आहे. मृत्यूदर कमी होतोय, संसर्ग मात्र वाढतोय. सध्या रूग्णालयात बेड उपलब्ध आहे. लसीकरणाच प्रमाण वाढविण्याची गरज आहे. आतापर्यंत 30 लाख लोकांपर्यंत लसीकरण झाले आहे”, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

“लसीचा पुरवठा व्यवस्थित होतोय. राज्यात रोज सव्वा लाख लोकांना लस दिली जात आहे. खासगी रूग्णालयात लसीकरण मोठ्या प्रमाणात करण्याचे आदेश दिले आहेत. 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटाच्या नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावं. कारण त्यांना जर कोरोना झाला तर त्यांची तब्येत गंभीर होण्याची शक्यता असते. त्यामुळे लवकरात लवकर या वयोगटातील लोकांनी लसीकरण करून घ्यावे”, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं.

Protected Content