ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल अटींचे पालन करून सुरु

जळगाव, प्रतिनिधी ।  के.सी.ई. सोसाइटी संचालित ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल आज दिनांक 8 मंगळवार रोजी महाराष्ट्र शासनाच्या शाळा सुरू करण्याच्या आदेशानुसार सर्व अटी व नियमांचे पालन करून सुरू करण्यात आली .

नियमांचे काटेकोर पालन करून शाळेचे निर्जंतुकीकरण करण्यात आले होते तसेच विद्यार्थी  बैठक व्यवस्था देखिल नियमानुसार करण्यात आलेली होती. आज इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. उपस्थित विद्यार्थ्यांन कडून पालकांचे संमती पत्र भरुन घेण्यात आलेले आहेत. शाळा नियमानुसार सुरू करण्यासाठी शाळेच्या प्राचार्य  सुषमा कंची यांच्या मार्गदर्शनाखाली इतर कर्मचारी यांनी कामकाज पहिले.

Protected Content