जामनेर, प्रतिनिधी | जळगाव येथे दि. १२ डिसेंबर रोजी भव्य सरपंच परिषद मेळावा होणार असून या मेळाव्याला जास्तीत जास्त जिल्हाभरातून सरपंच यांनी उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार परिषदेत बोलताना सरपंच परिषद तालुका अध्यक्ष राजमल भागवत यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेला जिल्हा समन्वयक युवराज पाटील, जिल्हा समन्वयक श्रीकांत पाटील, बाळू धुमाळ, तालुका समन्वयक बाळू चव्हाण आदी उपस्थित होते.
रविवार दि. १२ डिसेंबर रोजी जळगाव येथील आदित्य लॉन लोकमत कार्यालय शेजारी दुपारी बारा वाजता सरपंच परिषद मेळावा होणार असून या कार्यक्रमाला जळगाव जिल्हा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जलसंपदा मंत्री तथा आमदार गिरीश महाजन सरपंच परिषद प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे प्रदेश सरचिटणीस विकास जाधव यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील आमदार, खासदार व सर्वपक्षीय प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. त्याचबरोबर सरपंच परिषद मेळाव्यात हिरवे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार केला जाणार आहे. या सरपंच परिषद ही सरपंचांना संघटित करून त्यांच्या विविध मागण्यासाठी लढा उभारला जाणार आहे, त्याच बरोबर सरपंचांना येणाऱ्या अडचणीवर चर्चा मेळाव्यात होणार आहे. या मेळाव्यात सरपंचाचे माहिती व अधिकाराबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील सर्व सरपंचांनी सदर मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन सरपंच परिषद जळगाव जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे.