सरकार…!, आतातरी दारूची ऑनलाईन विक्री करा : डॉ. नितु पाटील (‘पटत का बघा ?’ भाग ३)

भुसावळ प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा फैलाव आता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच आता मद्य विक्रीसाठी शासनाने परवानगी दिली असतांना “मद्याची ऑनलाईन विक्रीची सुविधा का नाही?” असा सवाल डॉ. नितु पाटील यांनी आपल्या ‘पटत का बघा ?’ या सदरातून उपस्थित केला आहे. ऑनलाईन मद्य पुरवठा केल्यास शासनाचा महसुल वाढणार आणि परदर्शक व्यवहार होणार आहे. यासारखे डॉ. पाटील यांनी इतर विविध उपाय सुचविले आहेत.

घरगुती सामान खरेदी करायचे आहे. ………. ऑनलाईन सुविधा आहे
कपडे खरेदी करायचे आहे………….. ऑनलाईन सुविधा आहे
औषधी खरेदी करायची आहे……….. ऑनलाईन सुविधा आहे
वीज बिल, मोबईल बिल आदी भरायचे आहे……. ऑनलाईन सुविधा आहे
निविदा भरायची आहे……. ऑनलाईन सुविधा आहे
बँकेत जायला वेळ नाही…… ऑनलाईन सुविधा आहे
नवरा-नवरी शोधायची आहे…. ऑनलाईन सुविधा आहे
सध्याच्या डिजिटल युगात सर्व काही ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे, मग

“मद्यविक्रीला ऑनलाईन विक्रीची सुविधा का नाही?”
घर बसल्या ऑनलाइन विक्रीचा प्रतिनिधी घरी मद्य घेवून आल्यावर किती आनंद होईल.
आणि पैसे दया घरी आल्यावर …….सर्व कस पारदर्शक व्यवहार, महसूल पण आहेच,
शिवाय मद्य खरेदी केल्यावर बिल मिळत नाही ही ओरड पण नाही.
महाराष्ट्र शासनाला पण केव्हाही मद्य खरेदी-विक्रीचे ऑनलाईन तपासणी करता येईल.
रस्तावर दुकानात रांगेत उभे राहण्याची गरज नाही.
विषेश म्हणजे बोगस दारू मिळाल्यास कंपनीवर रीतसर तक्रार करता येणार …कारण पक्का बिल हातात राहणार …..!
तेव्ह्या ऑनलाइन सुविधा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नक्कीच पारदर्शी प्रयत्न करावेत….!विकासासाठी महसूल हवा ना ..!

सदर माहिती जनहितार्थ असल्यामुळे कोणीही शेअर करण्यास हरकत नाही.

डॉ.नितु पाटील,
०८०५५५९५९९९
दि.२८.०९.२०१७

Protected Content