जामनेरात होमिओपॅथी असोसिएशनतर्फे रोगप्रतिकारक औषधींचे वाटप

जामनेर (प्रतिनिधी)। जामनेर शहर होमिओपॅथी असोसिएशनव पुष्पा मेडिकल एजन्सी संचालक निलेश शर्मा यांच्या संयुक्त विद्यमाने १ हजार नागरिकांना पुरेल असे होमिओपॅथी प्रतिबंधात्मक औषध तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांच्याकडे सोपविण्यात आले.

आयुष मंत्रालय भारत सरकार यांनी सदर औषधाची शिफारस केली आहे. ग्रामीण भागात परजिल्ह्यातुन व परराज्यातुन तालुक्यात मोठ्या प्रमाणात नागरिक आले आहेत त्यातील काहींना होमक्वारंटाईन तर काहींना इतर ठिकाणी इन्स्टिट्युशनल कोरंटाईन करण्यात आलेले आहे. या सर्वांना होमिओपॅथी औषधांचा ७ दिवस डोस दिला जाणार आहे. हा डोस घेणे ऐच्छिक राहणार आहे. त्यांचे नाव मोबाईल नंबर किती दिवस डोस घेतला, याबाबत अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका आरोग्यसेवक, आरोग्यसेविका यांच्याकडे नोंद ठेवली जाईल. जामनेर शहरातील बाहेरून आलेल्या नागरिकांना औषधी मिळण्यासाठी डॉ.विनय सोनवणे यांनी विशेष व्यवस्था केली आहे. आयुष विभागाच्या डॉ. अपर्णा डांगरे यांच्याकडे सकाळी ९ ते १२ पर्यंत आपले नाव व मोबाईल नंबर नोंदवून सदर औषध मिळणार आहे. या उपक्रमाची तहसीलदार साहेब अरुण शेवाळे यांनी सुद्धा सदर उपक्रमाची प्रशंसा केली आहे.

उपस्थितीतील मान्यवर
आरोग्य विभागाचे डॉ.मनोज तेली, डॉ.नामदेव पाटील, डॉ. राहुल वाणी, आशा कुयटे, बशीर पिंजारी, दिनेश बारी व होमिओपॅथी असोसिएशनचे डॉ. के. एम. जैन, डॉ.नरेंद्र कुलकर्णी, डॉ.मनोज विसपुते, डॉ.सागर पंडित, डॉ. अमोल पाटील, डॉ.योगेश इंगळे, डॉ.पवन पाटील उपस्थीत होते. डॉ.सोनवणे यांनी सदर उपक्रमाबाबत होमिओपॅथी असोसिएशनचे आभार मानले.

Protected Content