जळगाव प्रतिनिधी । शहरातील जुन्या सम्राट कॉलनी परिसरात प्रतिबंधित क्षेत्रात पत्रा का लावला, असे विचारल्याच्या कारणाने एकाला तिघांनी ठार मारण्याची धमकी देत चापटाबुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ केल्याची घटना शुक्रवारी दुपारी २ वाजता घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील जुनी सम्राट कॉलनी येथे ॲड. नेमीचंद मोतीला येवले (वय-३०) आपल्या परिवारासह राहतात. या कॉलनीतील प्रतिबंधित क्षेत्रात पिंटू परदेशी पत्रा लावत होता. त्याला पत्रा का लावतो? तू नगरपालिकेचा कर्मचारी आहे का? असे विचारण्याचा राग आल्याने त्याने भांडण केले. हे भांडण वसंत तळवेलकर यांनी सोडवल्यानंतर काही वेळाने पिंटू परदेशीसह जितू परदेशी, दीपक उर्फ भुरा जोशी (रा. सम्राट कॉलनी) या सर्वांनी घरी येऊन पुन्हा भांडण केले. या सर्वांनी नेमीचंद येवले हा घरात घुसन ठार मारण्याची धमकी देत शिवीगाळ मारहाण केली. तर दीपक जोशी याने दुचाकीचा (एमएच १९, बीएल ५३१९) हेडलाइट फोडून नुकसान केल्याने या तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. नेमीचंद येवले यांच्या फिर्यादीवरून तिघांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल वाठोरे करीत आहे.